अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलनं सर्वांचं लक्ष वेधते. आता तिचा हा लूकसुद्धा तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
चित्रपट, मालिका आणि युट्यूब बॉग्जच्या माध्यमातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही सतत फोटो पोस्ट करत असते.
पारंपारिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खासच दिसते. प्राजक्ताने नुकतेच तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी तिचे हे फोटो रिपोस्टसुद्धा केले आहेत.
काही दिवसांपूर्वी तिनं महाराष्ट्राची सफरही केली आहे. 'मस्त महाराष्ट्र' या कार्यक्रमाचं सुत्रसंचलन करत तिनं रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची ओळख करुन दिली.