
अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) लग्नाला महिना पूर्ण झाला असून यानिमित्त आलियाने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. लग्नानंतरच्या पार्टीतील हे दोघांचे फोटो आहेत.

रणबीरच्या घरीच लग्नानंतर बॉलिवूडमधल्या मित्रमंडळींसाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्याच पार्टीतील हे फोटो आता समोर आले आहेत. शाहरुख खान, गौरी खान, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करण जोहर यांसारख्या दिग्गजांनी या पार्टीला हजेरी लावली होती.

या पार्टीत आलियाने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर रणबीरने क्लासिक थ्री-पीस सूट परिधान केला होता. 14 एप्रिल रोजी कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली.

पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आलिया-रणबीरने लग्नाचा निर्णय घेतला. लवकरच ही जोडी ऑनस्क्रीनसुद्धा एकत्र झळकणार आहे. 'ब्रह्मास्त्र' या अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटात दोघांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

रणबीर-आलियाने मुंबईतल्या ‘वास्तू’ या निवासस्थानी 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधली. रणबीरच्या या बंगल्याच्या बाल्कनीतच त्यांचं लग्न पार पडलं. यावेळी फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.