Marathi News Photo gallery Appi amchi collector serial updates major twist in story will appi and arjun come together Shivani Naik Parshuram Rohit
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अप्पी-अर्जुन पुन्हा येतील एकत्र?
या आरोपांमुळे अप्पी-अर्जुनमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होणार का? आर्याचा हा प्लॅन यशस्वी होईल का? हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल. 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका दररोज संध्याकाळी 7 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अमोल त्याच्या आई-बाबांना एकत्र आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. अमोल रोज काहीतरी रेखाटत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. जेव्हा दिप्या त्याला सतत प्रश्न विचारतो तेव्हा हे स्पष्ट होतं की अमोल त्याच्या वाढदिवसाची चित्रे काढत आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा वाढदिवस!
दरम्यान, अप्पी आणि अर्जुन यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत आहे. तेव्हा रुपाली आर्याला सांगते की “अप्पी आणि अर्जुनमधील सर्वात मोठी लढाई फक्त एकाच गोष्टीवर असू शकते ती म्हणजे तत्त्वांवर.” तिने अर्जुनच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. रुपाली आणि आर्याने याचा वापर करून दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
इकडे अमोल त्याचं रेखाचित्र पूर्ण करतो आणि अप्पी आणि अर्जुनला दाखवतो. गेल्या सात वर्षांत त्यांनी काय गमावलं हे दोघांच्या लक्षात येतं. अप्पी आणि अर्जुन दोघांचेही डोळे पाणावतात.
अर्जुन पहिल्यांदा कबूल करतो की त्याला अप्पीवर खूप राग आला होता, पण कुठेतरी तो तिची काळजीही करत होता. तो नेहमी अप्पी आणि अमोलसाठी प्रार्थना करायचा.
अप्पीला असे वाटतं की आता सगळं संपलं आहे. अर्जुन आर्याशी बोलण्याचा निर्णय घेतो. घरातले सगळे हा क्षण साजरा करायचं ठरवतात. त्याचवेळी, रात्री त्या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करत असताना एक माणूस येतो आणि अर्जुनवर पुरावे सादर करत भ्रष्टाचाराचा आरोप करतो.