हाँगकाँगचा क्रिकेट संघ आशिया कपसाठी पात्र ठरला आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तान समवेत ग्रुप ए मध्ये प्रवेश केला आहे.
आशिया कपसाठी क्वालिफाय करणाऱ्या या टीम मधून त्या देशाचे खेळाडू गायब आहेत. म्हणजे हाँगकाँगचा संघ असला, तरी त्या टीम मध्ये मूळ त्या देशाचे खेळाडू नाहीयत. खरंतर हाँगकाँगच्या टीम मधून भारत-पाकिस्तानचे खेळाडू खेळणार आहेत.
टीम हाँगकाँगची, मग त्यात भारत-पाकिस्तानचे खेळाडू कसे? तर त्यासाठी हे समजून घ्या. हाँगकाँगने आशिया चषकासाठी जो 17 सदस्यीय संघ निवडलाय, त्यात एकही हाँगकाँगचा खेळाडू नाहीय. भारत, पाकिस्तान आणि ब्रिटिश वंशाचे खेळाडू या टीम मध्ये आहेत.
आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या हाँगकाँगच्या संघात पाकिस्तानी वंशाचे 12 खेळाडू आहेत. 4 खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. 1 प्लेयर इंग्लिश वंशाचा आहे.
क्वालिफाय मध्ये अपराजित राहून हाँगकाँगच्या संघाने आशिया कपच तिकीट मिळवलं आहे. क्वालिफायर मध्ये त्यांनी कुवेत, ओमान आणि यूएईच्या संघांना हरवलं.