अनेक लोकांना जास्त प्रमाणात मद्यपान करण्याची सवय असते. यामुळे यकृतचे आणि फुफ्फुसांचे नुकसान होऊ शकते. तसेच यामुळे दम्याचा त्रास देखील होऊ शकतो.
जास्त प्रमाणात मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले नसते. फुफ्फुसांसाठी हे धोकादायक आहे. जास्त सोडियममुळे दम्याची लक्षणे दिसू लागतात.
तळलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल, चरबी आणि हृदयाची समस्या उद्भवू शकते. लठ्ठपणामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो.
पोटातील गॅसची समस्या फुफ्फुसांवर देखील परिणाम करते. कोबी आणि ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक असतात. परंतु कोबी आणि ब्रोकोलीचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळले पाहिजे.
सॉफ्ट ड्रिंक जास्त प्रमाणात घेऊ नका. त्यात साखर जास्त प्रमाणात असते. ज्याचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. यामुळे आपल्याला ब्राँकायटिसच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.