Photos : पर्यटकांच्या भेटीसाठी नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय संग्रहालय सज्ज
नागपूर शहराशेजारी असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय.
Follow us
नागपूर शहराशेजारी असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय.
26 जानेवारी रोजी येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते इंडियन सफारीचं उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी येथली इंडियन सफारी कशी आहे यावरील हा खास रिपोर्ट.
हे प्राणी संग्रहालय आहे नागपूर शहरालगत असलेलं बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय. हे संग्रहालय 1900 हेक्टरवर पसरलं आहे. मात्र आता पहिल्या टप्प्यात 145 हेक्टरवर इंडियन सफारी सुरू करण्यात येत आहे.
यात चार भागात प्राण्यांचं दर्शन होणार आहे. पहिला भाग म्हणजे लेपर्ड सफारी. या ठिकाणी सध्या चार लेपर्ड सोडण्यात आलेत. ते या ठिकाणी मुक्त संचार करत आहे.
दुसरा भाग म्हणजे अस्वल सफारी. इथे चार अस्वल आहेत. त्यांनी चक्क आम्हालाही दर्शन दिल. तिसरा भाग म्हणजे हरीण सफारी या ठिकाणी हरिणाचे कळप आपल्या स्वागतासाठी उभे असल्यासारखे दिसतात.
चौथा भाग म्हणजे टायगर सफारी. या ठिकाणी दोन वाघ सोडण्यात आलेत. इंडियन सफारी आता सुरू होत असून त्याचा फायदा पर्यटनाला होणार आहे. मात्र भविष्यात या ठिकाणी नाईट सफारीपासून तर वेगवेगळ्या सफारी सुरू करण्यात येणार आहेत.
या संग्रहालयाचे प्रधान मुख्य वन संरक्षक एन रामबाबू यांनी सांगितलं, “या ठिकाणी जाण्यासाठी 40 सीटर बसची व्यवस्था करण्यात आलीय. ही सुविधा सफारीसाठी करण्यात आलीय.
मात्र ही सफारी आणि जंगल सफारी यांच्यात फरक आहे. जंगल सफारीमध्ये प्राणी दिसेलच हे निश्चित नाही. मात्र, या ठिकाणी प्राण्यांचं दर्शन नक्की होऊ शकतं. कारण याचा परिसर लहान असतो. एकंदर या जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊनच अनुभव घ्यावा लागणार आहे.