‘बिग बॉस 14’ साठी चाहते अत्यंत उत्सुक आहेत. प्रत्येकवर्षी बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रिटी येणार याची चर्चा असते. पण शो सुरु होण्यापूर्वी कधीही अधिकृत यादी उघड केली जात नाही. तरीही दरवर्षी बिग बॉसच्या घरात कोण जाणार याबाबत शक्यता वर्तवली जाते. अशीच 14 नावं यंदाही चर्चेत आहेत. जी कदाचित यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात सहभागी होऊ शकतात.
निया शर्मा - अभिनेत्री निया शर्मा‘खतरों के खिलाडी-मेड इन इंडिया’या कार्यक्रमाची विजेती ठरली. तिचंही नाव ‘बिग बॉस 14’ साठी चर्चेत आहे. निया शर्मा अत्यंत लोकप्रिय आहे.
जास्मिन भसीन - कलर्स टीव्हीच्या या आवडत्या नागिनचं बिग बॉसच्या घरात जाणं कन्फर्म मानलं जात आहे. सोशल मीडियाच्या सूत्रांनी जास्मिन भसीनचा परफॉर्मेन्ससाठी तयारी करत असतानाचा फोटो शेअर केला आहे.
निशांत मलकानी - बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता निशांत मलकानीने zee टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ ला बाय-बाय म्हटलं. या कार्यक्रमात तो मुख्य भूमिकेत होता.
आम्रपाली दुबे - बिग बॉसमध्ये नेहमी एक भोजपुरी कलाकार असतो. यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात भोजपुरी सिनेमांची सुपरस्टार आम्रपाली दुबे असण्याची शक्यता आहे. मेकर्सने तिला अप्रोच केल्याची माहिती आहे.
पवित्रा पुनिया- बालवीरला घाबरवणारी काललोकची राणी आता बिग बॉसच्या घरात येणार आहे. पवित्राने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारल्या आहेत.
सारा गुरपाल - बिग बॉस मध्ये पंजाबी तडका नेहमी रंगत वाढवतो. यावेळी हे काम पंजाबी गायिका, मॉडेल आणि अभिनेत्री सारा गुरपाल करणार आहे.
आकांशा पुरी - कॅलेंडर गर्ल आकांशा पुरीने नुकतंच सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका 'विघ्नहर्ता गणेश'ला सोडलं. यामध्ये ती मुख्य भूमिकेत होती. त्यामुळे ती यंदाच्या बिग बॉसच्या पर्वात असणार असं समजलं जात आहे.
जान - लोकप्रिय गायक कुमार सानुचा मुलगा जान हा देखील यंदाच्या पर्वात असण्याची शक्यता आहे. निर्मात्यांना गायक आदित्य नारायणला या कार्यक्रमात घ्यायचं होतं. पण आदित्यने नकार दिल्यावर जानला विचारण्यात आलं.
स्नेहा उल्लाल - बिग बॉस 14 मध्ये स्नेहा उल्लाल असण्याची शक्यता आहे. ऐश्वर्या राय सारखी दिसणाऱ्या स्नेहाने सलमान खानसोबत ‘लकी-नो टाइम फॉर लव्ह’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
नैना सिंह - ही अनेक रिअॅलिटी कार्यक्रमांमध्ये दिसली. नैना स्प्लिट्सविला-10 ची विजेती होती. स्प्लिट्सविला व्यतिरिक्त ती इंडियाज नेक्स्ट सुपरस्टारची फायनलिस्टही होती. नैनाने ‘कुमकुम भाग्य’ या कार्यक्रमाला यावर्षी राम राम ठोकला.
निक्की तम्बोली - दक्षिण भारतीय अभिनेत्री निक्की तम्बोलीने एक झलक दाखवली आहे, यामध्ये ती प्रीमियरच्या शूटिंगसाठी मेकअप करताना दिसत आहे. निक्कीने यावेळी अॅनिमल प्रिंट कपडे परिधान केले होते.
राधे माँ - एका रिपोर्टनुसार, राधे माँ देखील बिग बॉसच्या या पर्वात असणार आहे. गेल्या पर्वातच निर्मात्यांनी राधे माँला अप्रोच केलं होतं.
शगुन पांडेय - शगुन पांडेय हा झी टीव्हीच्या ‘तुझसे है राबता’ या कार्यक्रमात दिसला होता. शगुन यापूर्वी स्प्लिट्सविलामध्ये सहभागी झाला होता.