ब्लॅक टी की ब्लॅक कॉफी ? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय ?
ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी ही दोन्ही पेयं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. पण दोघांपैकी कोणते पेय जास्त फायदेशीर आहे ते जाणून घेऊया.
Follow us
हेल्थ कॉन्शिअस लोकं साखर आणि दुधाचा चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतात. दोन्ही पेयांचे आरोग्याला फायदे आहेत. पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून या दोनपैकी कोणते पेय चांगले आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ( photos : freepik)
ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे मुक्त रॅडिकल्सशी लढून आपल्या पेशींचे संरक्षण करतात. परंतु, ब्लॅक टी मध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट EGCG ब्लॅक कॉफीपेक्षा अधिक प्रभावी मानले जाते. याशिवाय ब्लॅक टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स, पॉलीफेनॉल सारखे पोषक घटक आढळतात जे अनेक गंभीर आजारांशी लढण्यास मदत करतात.
ब्लॅक कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असते जे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. ब्लॅक टीमध्ये कॅफिनची पातळी खूप कमी असते.
ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. जे तुम्हाला त्वरित ऊर्जा देते. वर्कआऊट किंवा व्यायाम करण्यापूर्वी ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी हे एक चांगले पेय आहे. जिममध्ये जाण्यापूर्वी बरेच लोक ब्लॅक कॉफी पितात.
ब्लॅक कॉफीपेक्षा ब्लॅक टी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. ब्लॅक टी मध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि कॅफिनचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी चांगले असते. तथापि, दोन्हीचे सेवन कमी केले पाहिजे. (डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)