बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच लूकमध्ये कायम चर्चेत असते. अनेकदा तिच्या लुकने चाहत्यांना वेड लावत असते. याच्या ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
जान्हवी कपूर नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसून आली जान्हवीचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा थाई हाय स्लिट गाऊन घातला आहे. केसांचा बन आणि नेकपीससह तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. स्मोकी आय मेकअपमुळे जान्हवीचा हा लूक आणखीच सुंदर होता.
जान्हवीच्या या फोटोवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. यामध्ये सेलिब्रिटीचाही समावेश आहे. शनाया कपूरने ब्लॅक हार्ट पोस्ट करत फोटोवर कमेंट केल्या आहेत. एका युझरने दुनिया सबसे सुंदर हो अशी कमेंट केली आहे.
जान्हवीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचे झाले तर तिच्या गुड लक जेरी या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.