Business Empire :  वाडवडिलांचा जपला वारसा, पुढील पिढीने उभे केले अब्जावधींचे साम्राज्य

Business Empire : देशात अनेक दिग्गज घराणी आहेत. काहींच्या अगोदरच्या पिढीचे संचित म्हणून दुसऱ्या पिढीने पण त्यांचा व्यवसाय वाढवला. काहींना आता सुरुवात करत मोठा वटवृक्ष तयार केला. दुसरी पिढी व्यवसायाचा डोलारा सांभाळायला सज्ज झाली आहे. टाटा, अंबानी, अदानीपासून अनेक समूहात आता खांदेपालट सुरु आहे.

Business Empire :  वाडवडिलांचा जपला वारसा, पुढील पिढीने उभे केले अब्जावधींचे साम्राज्य
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 2:04 PM

भारतात गेल्या काही वर्षांपासून अनेक अब्जाधीशांनी पुढील सोबत घेत आज मोठे साम्राज्य तयार केले आहे. काहींच्या अगोदरच्या पिढीने उद्योग व्यवसायात पाऊल टाकले. पुढील पिढीने पण उद्योग व्यवसाय वाढीसाठी मेहनत घेतली. भारतातील अनेक मोठ्या उद्योगांची हीच कर्मकहाणी आहे.

व्यवसाय, उद्योग सुरु करणाऱ्या पहिल्या पिढीला अनेक संकटाचा, अडचणींचा सामना करावा लागला. जिद्द, चिकाटीने त्यांनी प्रचंड कमाई केली. कंपन्यांना नवीन उंचीवर नेऊन ठेवले. यामध्ये पहिले नाव जमशेदजी टाटा यांचे येते.

जमशेद टाटा यांना भारतीय उद्योगाचे जनक म्हणण्यात येते. त्यांनी आयरन आणि स्टील कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर टाटा समूह तयार झाला. आज जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचे नाव आहे. रतन टाटा आणि दोराब टाटा यांनी हा समूह मोठा केला. त्यांनी त्यासाठी मेहनत घेतली.

हे सुद्धा वाचा

धीरुभाई अंबानी यांच्या प्रयत्नांनी रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशनची स्थापना झाली. त्यांच्या दूरदृष्टीने आजचा रिलायन्स समूह उभा आहे. हळूहळू ही कंपनी आज भारतातील मोठी कंपनी झाली. पुढे मुकेश आणि अनिल अंबानी यांनी विस्तार केला. आज मुकेश अंबानी यांनी तर या समूहाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक कंपन्यांचा हा एक समूह झाला आहे. एखाद्या छोट्या राज्याच्या बजेट इतकी उलाढाल या समूहाची आहे.

आता अंबानी कुटुंबामध्ये पण खांदेपालट झाली आहे. नवीन पिढीला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवीन पिढीत आकाश आणि अनंत अंबानी, मुलगी ईशा अंबानी यांनी नेटाने प्रयत्न सुरु केले आहे. मुकेश अंबानी एकूण 94.7 अब्ज डॉलर संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

गौतम अदानी आणि त्यांचा मुलगा जीत अदानी समूहाला पुढे नेत आहेत. गौतम अदानी यांची पुढची पिढी पण सज्ज झाली आहे. गौतम अदानी 32 अब्ज डॉलर कंपनीचे मालक आहेत. ते बंदरे, विमानतळ, वीज उत्पादन, वितरण, अक्षय ऊर्जा, सिमेंट आणि इतर व्यवसायात पाय रोवून उभे आहेत.

लाला केदारनाथ अग्रवाल रोजगाराच्या शोधात 1947 मध्ये बिकानेर येथून दिल्लीत आले होते. चांदनी चौकात त्यांनी मिठाई आणि इतर खाद्य पदार्थांचे हॉटेल सुरु केले होते. त्यानंतर ही प्रसिद्ध बिकानो नावाची कंपनी झाली. त्यांचा मुलगा मनीष अग्रवाल यांनी या व्यवसायाचा विस्तार केला. आज या कंपनीचे उत्पादने 35 देशात विक्री होतात.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.