आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.
आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.
अशी लोकांकडून इतरांना प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.