Chandrakant Patil Banner : कोथरुडच्या रस्त्यावर चंद्रकांत पाटील हरवल्याचे बॅनर, कुठे आहेत दादा?
सध्या चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. ते कोल्हापुरात जोरदार प्रचार करत आहेत. मात्र इकडे कोथरूडच्या रस्त्यावर चंद्रकात पाटील हरवल्याचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या या हटके अंदाजाची चर्चा आहे. चंद्रकात पाटील यांनी मागची निवडणूक ही कोल्हापूरऐवजी कोथरूडमधून लढवली. त्यांचा तो मतदारसंघ आहे. त्यामुळेच हे बॅनर सध्या कोथरूडच्या रस्त्यावर पहायला मिळत आहे.
Most Read Stories