हरिशंकरने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीच्या डाव्या बाजूला उभा आहे. तो फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, 'ड्रीम प्रोजेक्ट...' दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. तसंच दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे.
Follow us
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलसाठी सध्या चेन्नई सुपर किंग्स जोरदार तयारी करत आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर टीमचं प्रॅक्टिस सेशल सुरु आहे. यामध्ये खेळाडू विशेष मेहनत घेत आहेत. अशातच फ्रेचायजीने महेंद्र सिंग धोनीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तगडे शॉट खेळताना दिसून येत आहे. तसंच त्याचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.
चेन्नईचा कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी 22 वर्षीय गोलंदाज हरिशंकर रेड्डीच्या गोलंदाजीवर क्लिनबोल्ड झाला. रेड्डीला बॉल इतका स्पीडमध्ये होता की धोनीला काही कळायच्या आत बॉल लेग स्टम्पवर जाऊन आदळला.
व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की धोनीला बोलिंग करण्यासाठी हरिकिशन रनअप घेतो. तो स्टम्पच्या जवळ येऊन पूर्ण ताकदीने बॉल फेकतो. तो बॉल एवढा स्पीडने पडतो की धोनीला बॉलचा अंदाज येत नाही. सरतेशेवटी धोनीचा लेग स्टम्प उखाडला जातो.
हरिशंकरने धोनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामध्ये तो धोनीच्या डाव्या बाजूला उभा आहे. तो फोटो शेअर करताना त्यानं लिहिलंय, ‘ड्रीम प्रोजेक्ट…’ दोघांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य आहे. तसंच दोघांनीही सीएसकेची जर्सी घातली आहे.
हरिकिशन रेड्डीला चेन्नईने 20 लाख रुपये देऊन आपल्या संघात समावेश करुन घेतला आङे. त्याने आंध्रप्रदेशसाठी विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार गोलंदाजी केलीय.