Anant-Radhika Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपूत्र अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा सध्या चर्चेत आहे. नुकतेच ते राधिका मर्चेंट बरोबर विवाहबद्ध झाले. या लग्नातील रिर्टन गिफ्ट चर्चेत आहे. अनंत यांनी आपल्या जवळच्या मित्रांना लग्नात एक खास गिफ्ट दिलं.
anant ambani radhika merchant grand wedding
Follow us
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या ग्रँड वेडींगची सर्वत्र चर्चा आहे. या विवाह सोहळ्यात बॉलिवूड, क्रीडा, उद्योग आणि अन्य क्षेत्रातील सर्व दिग्गज सहभागी झाले होते.
अनंत यांनी लग्नाच्या निमित्ताने आपल्या जवळच्या माणसांना खास आणि महागडं गिफ्ट दिलं. या गिफ्टी सर्वत्र चर्चा आहे. डोळे दिपवून टाकणारा हा ग्रँड वेडींग सोहळा अजूनही सुरु आहे.
रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी यांनी जवळच्या मित्रांना 2 कोटी रुपयाच लग्जरी घड्याळ गिफ्टमध्ये दिलं. AUDEMARS PIGUET ब्रांडच हे घड्याळ आहे.
ज्यांना गिफ्ट मिळालं, त्यात रणवीर सिंग, शाहरुख खान सारखे स्टार्स आहेत. त्याशिवाय अनंत यांच्या जवळच्या मित्रमंडळींना हे गिफ्ट देण्यात आलं.
जे घड्याळ गिफ्टमध्ये देण्यात आलं, ते 41mm 18k पिंक गोल्ड केसने बनलेलं आहे. घड्याळाची लांबी 9.5 mm आहे. डायल पिंक गोल्ड आहे.