मराठी मालिकांमध्येही रंगणार गणेशोत्सव, कलाकारांवर चढणार सणाच्या आनंदाचा रंग!
झी मराठीने 'नव्या नात्यांच्या बांधू गाठी' असं म्हणत ऑगस्ट महिन्यात नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सादर केल्या. या सर्व मालिकांना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. झी मराठी म्हणजे मराठी संस्कृती आणि परंपरांचा आरसा आणि सध्या सगळीकडे श्रींच्या आगमनाची लगबग चालू आहे त्यात झी मराठी देखील यंदाचा गणेशोत्सव प्रेक्षकांसाठी खास बनवण्यासाठी विशेष सादरीकरण करणार आहे.
Most Read Stories