
अध्ययन सुमन हा शेखर सुमन यांचा मुलगा आहे. अध्यायन यांने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली, पण आज ते गायकही आहे. अध्ययनचे नाव चित्रपटांपेक्षा जास्त वादांमुळे चर्चेत असते.

अध्ययनचे वडिल शेखर एकदा म्हणाले होते की, अध्ययन खूप जास्त नैराश्यातून गेला आहे. त्याच्या मनाच अनेक वेळा आत्महत्या करण्याचा विचार देखील आला होता. बॉलीवूडमध्ये त्याच्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या

अध्ययनने 2008 साली 'हाल-ए-दिल' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. मात्र, त्याला खरी प्रसिध्दी राज द मिस्ट्री कन्टीन्यूज या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत मुख्य भूमिकेमध्ये कंगणा राणावत होती.

राज द मिस्ट्री कन्टीन्यूज या चित्रपटांनंतर अध्ययनला बरेच चित्रपट मिळाले. मात्र, या चित्रपटांना काही विशेष यश मिळाले नाही.

कंगना राणावतसोबतच्या नात्याबद्दलही अध्ययन खूप चर्चेत होता. तो कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, त्यानंतर अध्ययनने कंगनावर खूप मोठे आरोप केले होते.