रविवारी सकाळी टायगर श्रॉफला मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. तो दिशासोबत मालदीवला रवाना झालाय. यावेळी टायगर निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या कार्गोमध्ये दिसला. टायगरचा लूक मस्त दिसत होता.
तर दिशानं गुलाबी क्रॉप टॉप आणि जीन्स कॅरी केला होता.
दोघंही नेहमीप्रमाणे विमानतळांवर सोबत आले नाहीत आणि एकत्र फोटोसुद्धा क्लिक केले नाहीत.
टायगरबद्दल सांगायचं झालं तर तो लवकरच हीरोपंती 2 मध्ये दिसणार आहे.
तर दिशा सलमान खानसोबत राधे या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती एक एक विलन रिटर्न्समध्ये दिसणार आहे.