Ranbir Alia Wedding: मामाच्या लग्नात भाच्याची धम्माल! करीनानं काढला फोटोचा फोटो आणि म्हणाली…

Kareen Kapoor Son: मामाच्या लग्नात भाच्याचे धम्माल फोटो काढण्याचा मोह फोटोग्राफरलाही (Photographer) आवरता आला नाही. एकापेक्षा एक सुरेख फोटो क्लिक होत गेले.

Ranbir Alia Wedding: मामाच्या लग्नात भाच्याची धम्माल! करीनानं काढला फोटोचा फोटो आणि म्हणाली...
खास फोटो मागचा खास किस्साImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:02 PM

मुंबई : लग्नाची धावपळ आणि लहान मुलांचा दंगा हा ठरलेलाच! सर्वसामान्य लग्नात जे चित्र असतं, तेच सेलिब्रिटींच्याही लग्नात (Celebrity wedding) असणारच. लहानग्यांची मस्ती आजूबाजूला माणसं दिसली, की आणखीनंच वाढते. चिमुरड्यांच्या प्रतिभेला बहर येतोच येतो. मस्तीही वाढते आणि मग आनंदाला उधाण येतं. ही मस्ती आणि धम्माल करीनाच्या मुलानंही केली. मामाच्या लग्नात भाच्याचे धम्माल फोटो काढण्याचा मोह फोटोग्राफरलाही (Photographer) आवरता आला नाही. एकापेक्षा एक सुरेख फोटो क्लिक होत गेले. हे फोटो नंतर करीनानंही पाहिले. मग काय? एकापेक्षा एक खास फोटो पाहून करीनानं कॅमेऱ्यात काढलेल्या फोटोचाच फोटो काढला आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला. हा फोटो शेअर करत करीनानं आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमालाही वाट मोकळी करुन दिली.

पाहा करीनाचा खास फोटो

लग्नाची धावपळ..

लग्नाच्या धावपळीच करीनानं आपल्या मुलासोबत फोटोसेशन केलं. मामा रणबीर कपूरच्या लग्नाला करीना सहकुटुंब सहपरिवार आली होती. यावेळी आपल्या दुसऱ्या मुलासोबतचे फोटो करीना कपूर-खाननं इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये करीनाचा दुसरा मुलगा जेह अली खानचा गोंडस चेहरा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय.

करीनाला दोन मुलं आहेत. मोठ्या मुलगा तैमूर तर धाकडा जेह. जेहचा जन्म फेब्रुवारी 2021ला झाला. वर्षभराच्या जेहसोबत खास क्षण शेअर करताना करीना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा फोटो शेअर करत करीरानं फ्रेमचंही कौतुक केलंय आणि जेह आपल्या काळजाचा तुकडा असल्याचंही म्हटलंय.

अवघ्या चार तासांतह करीनानं शेअर केलेल्या या फोटोला जवळपास 10 लाख लोकांनी लाईक केलंय. अनेक सेलिब्रिटिंनी या फोटोवर कमेंट करत लव्ह रिएक्ट केलंय.

दरम्यान, या लग्नातील इतरही फोटो करीरानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावेळी नवरदेव आणि वडीलांचाही फोटो करीनानं शेअर केलाय. तसंस करण जोहरसोबतचाही फोटो करीनानं शेअर केलाय.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.