
तारक मेहता का उल्टा चष्मा हा प्रत्येक घरातला आवडता शो आहे. गेले अनेक वर्ष हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या सर्व कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील कलाकारांचे विशेष काैतुक लोकांकडून केले जाते. आता चाहत्यांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. इतकंच नाही तर चाहते त्यांचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल करतात.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुनयना फौजदार (Sunayana Fozdar) मालिकेमध्ये अतिशय साध्या वेशभूषेमध्ये असते. मात्र, रियल लाईफमध्ये सुनयना फौजदार अतिशय बोल्ड लूकमध्ये असते.

सुनयना फौजदारच्या इंस्टाग्रामवर अनेक प्रकारचे बोल्ड आणि स्टाईलिश फोटो आपल्याला बघायला मिळतील.

सुनयना चाहत्यांसाठी नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते. सुनयनाने फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.