चाहते अजय देवगण याच्या भोला चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरू असून चित्रपटातील अजयचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय.
1 / 5
अजयच्या भोला चित्रपटासोबतच त्यामध्ये काम करणारी साऊथची अभिनेत्री अमाला पॉल देखील चर्चेत आहे. कारण अमाला पॉल ही पहिल्यांदाच बाॅलिवूडमध्ये डेब्यू करते आहे.
2 / 5
अमाला पॉल ही साऊथची फेमस अभिनेत्री असून तिने तमिळ आणि मल्यालम चित्रपटांमध्ये हीट भूमिका केल्या आहेत. अमाला पॉल हिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
3 / 5
काही दिवसांपूर्वीच अमाला पाॅल हिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. अमाला पॉल कायमच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते.
4 / 5
अमाला पॉल हिने यापूर्वी एका हिंदी वेब सीरिजमध्ये डेब्यू केला होता. भोला हा तिचा पहिलाच बाॅलिवूड चित्रपट आहे.