उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. उर्फी तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकदा तिच्या कपड्यांमुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते. उर्फीला टिकेचा सामना करावा लागतो.
कोणी कितीही टिका केली तरीही उर्फी जावेद हिला काहीच फरक पडत नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही अत्यंत मोठा आहे.
उर्फी जावेद हिने शेअर केलेला प्रत्येक फोटो हा सोशल मीडियावर कायम व्हायरल होतो. अनेकजण उर्फीचे काैतुक करतात तर काहीजण तिच्यावर टीका करतात.
उर्फी जावेद हिची नवीन स्टाईल पाहून तुम्हाला धक्का बसेल. नुकताच उर्फी जावेद हिला विमानतळावर स्पाॅट केले गेले. यावेळी उर्फी अतरंगी लूकमध्ये दिसली. ज्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत.