Shrikant Moghe : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. (Shrikant Moghe passes away)

| Updated on: Mar 06, 2021 | 10:34 PM
ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.  श्रीकांत मोघे  यांनी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर अभिनयाचा ठसा उमटवला.

1 / 5
श्रीकांत मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर किर्लोस्करवाडी येथे झाला. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बी.एस्‌‍सी साठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. पुढे मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्य अभिनयाकडे वळले.

2 / 5
महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.  मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’अशी त्यांची प्रतिमा होती. श्रीकांत मोघे यांनी आतापर्यंत 60 हून अधिक नाटकांत आणि 50 हून अधिक चित्रपटांत कामे केले.

3 / 5
शम्मी कपूर शैलीत नृत्य करून रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख होती. श्रीकांत मोघे हे नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता होते. त्याशिवाय ते चित्रकार आणि वास्तुविशारद होते. तसेच उत्तम सुगम संगीत गायकही होते.

4 / 5
घराबाहेर, लग्नाची बेडी, अंमलदार, तुझे आहे तुजपाशी, आंधळ्यांची शाळा, वा-यावरची वरात, लेकुरे उदंड जाहली, सीमेवरून परत जा, इत्यादी नाटकांतून ठसा उमटवणाऱ्या मोघे यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ‘पुलकीत आनंदयात्री’ हा त्यांचा एकपात्री प्रयोगही जगात अनेक ठिकाणी सादर झाला आहे. रंगभूमीच्या क्षेत्रात सहा दशकांहून अधिक काळ वावरलेल्या श्रीकांत मोघे यांना नाटकाने नाव, पैसा आणि प्रसिद्धी दिली.

5 / 5
Follow us
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.