महाराष्ट्र, गुजरात, आंध्रात पूर…कंबरे इतक्या पाण्यात उतरल्या वायएस शर्मिला
देशातील अनेक राज्यात पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसाने उत्तर ते दक्षिण..अनेक राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आंध्रातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील अनेक गावात पाणी तुंबले आहे. जुलैमध्ये सरासरी पेक्षाही जादा पर्जन्यवृष्टी झाली आहे. पुण्यात सिंहगड परिसरातील मुळा नदी किनाऱ्यालवरील अनेक घरात पाणी घेल्याने लष्कराला मदतीसाठी बोलविण्याची वेळ आली आहे. आंध्रात तर माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण कॉंग्रेस नेत्या वायएस शर्मिला यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू यांच्यासह आपले बंधू माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावरही टिका केली आहे.
Most Read Stories