Photo Gallery: अहो खरंच का… गायीच्या पोटी जुळ्या वासरांची जोडी, गाव म्हणतंय मारुतीरायाच्या सेवेचा प्रसाद!
नांदेड : आतापर्यंत शेळीने एकपेक्षा अधिक करडांना जन्म दिल्याचे तुम्ही पाहिले असेल पण गायीने जुळ्या वासरांना जन्म वाटतयं ना अवास्तव पण हे खरे आहे. अहो खरंच गायींना जुळ्या वासरांना जन्म तर दिलाच पण दोन्ही हुबेहुबच अगदी जुळेच. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरडा येथे हा प्रकार घडला असून एकाच रंगाची आणि ते ही नर जातीचीच. आता याचे कुतूहल तर शेतकऱ्यांना राहणारच. त्यामुळे रविवारचा दिवस उजाडल्यापासून या जुळ्या वासरांना पाहण्यासाठी गर्दी केली जात होती.गावातील संतराम सुवर्णकार यांच्या गाईने या जुळ्या वासरांना जन्म दिला आहे.संतराम सुवर्णकार यांना तीन एकर जमीन असून,या शेतीवरच ते आपला उदरनिर्वाह करतात.त्यांनी गावातील हनुमान मंदिराची आयुष्यभर सेवा केली. त्याचाच हा प्रसाद असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
Most Read Stories