भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी आज (11 जानेवारी) चिमुकलीचे आगमन झाले आहे.
अनुष्काने मुलीला जन्म दिल्याची गोड बातमी विराटने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
जानेवारी महिन्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार याची माहिती विराटने आधीच चाहत्यांसोबत शेअर केली होती.
या आनंदाच्या आणि महत्त्वाच्या प्रसंगी अनुष्कासोबत राहावे म्हणून विराट सध्या सुट्टीवर आहे. या काळात तो अनुष्कासोबत व्यायाम करतानाही दिसला होता.
2013मध्ये एका जाहिरातीच्या सेटवर अनुष्का आणि विराट यांची पहिली भेट झाली होती. याच सेटवर त्यांची मैत्री जुळली.
या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि 2017मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्नगाठ बांधली.
2020मध्ये विरुष्काने त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या आयुष्यात ‘परी’चे आगमन झाल्याचे जाहीर केले आहे. यावर त्यांचे चाहते भरभरून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.