Photo | …जेव्हा करिना कपूरच्या मैत्रिणीवर युवराज सिंह फिदा झाला होता, वाचा खास लव्ह स्टोरी!
Follow us
भारतीय क्रिकेट टीममधील काही खेळाडू आणि बॉलिवूड अभिनेत्रींनी साता-जन्माच्या आणाभाका घेतल्या आहेत. याच जोड्यांपैकी एक म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंह आणि बॉडीगार्ड सिनेमात करीना कपूरच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हेजल कीच…
युवराज सिंह आणि हेजल कीच यांच्या लग्नाला नुकतीच 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. युवराज आणि हेजलची ओळख त्यांच्या एका कॉमन मित्राच्या बर्थडे पार्टीत झाली होती.
युवराज सिंहने एका मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, हेजलचं दिसणं आणि तिच्या निखळ हास्यावर युवराज फिदा झाला होता. अनेक वेळा युवराजने हेजलला कॉफी पिण्यासाठी माझ्याबरोबर येतेस का? म्हणून विचारलं पण हेजलने त्याला भाव दिला नाही.
दहा ते बारा वेळा विचारुनही युवराजच्या प्रश्नाला हेजलने उ्तर दिलं नाही. कदाचित हेजल दुसऱ्या कुणाला हेजल डेट करत असेल, असा विचार युवराजने केला.
काही महिन्यांनंतर युवराजच्या एका मित्राच्या फेसबुक अकाऊंटला हेजल फ्रेंड असल्याचं युवराजच्या निदर्शनास आलं. त्यावेळी त्या मित्राला युवराजने हेजलपासून दूर राहण्यास सांगितलं. त्याचवेळी हेजलला युवराजने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तब्बल तीन महिन्यानंतर हेजलने य़ुवराजची रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
पुढे 2016 साली युवराज आणि हेजलने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 30 नोव्हेंबर 2016 ला युवराज-हेजलचं चंदीगडमधल्या गुरुद्वारामध्ये खास पंजाबी पद्धतीने लग्न झालं.