सुष्मिता सेनची मोठी मुलगी रिनीनं आता अभिनयविश्वात पदार्पण केलं आहे. तिनं 'सुट्टाबाजी' या शॉर्टफिल्ममधून अभिनयाला सुरुवात केली आहे. 'सुट्टाबाजी' या शॉर्टफिल्मचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये रिनीनं केलेल्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.
21 वर्षीय रिनी प्रचंड क्यूट आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं आहे.
कबीर खुराना यांनी दिग्दर्शित केलेल्या या शॉर्टफिल्ममध्ये ती मुख्य भूमिकेत आहे.
सुट्टाबाजी'चा ट्रेलर सुष्मिताच्या वाढदिवसाला रिलीज करण्यात आला आहे. सुष्मितानं सुद्धा हा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे.
सुष्मिता सेननं सन 2000 मध्ये रिनीला दत्तक घेतलं होतं.