Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक
अहमदनगर : जसे जसे ऊसाचे गाळप वाढत आहे तसे दुसरीकडे ऊसाला आगीच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये वाढ झाली असून अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. अहमदनगरला पाथर्डी येथे शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जाळून नुकसान झाले आहेय. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट मुळे आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील यश आलं नाही. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या 10 शेतकऱ्यांच्या शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान केलं आहे.
Most Read Stories