Photo | IPL 2020 दिल्ली विरुद्ध हैदराबाद आमनेसामने, फायनलचं तिकीट कोण मिळवणार?
IPL 202 Delhi Capitals Vs sunrisers hyderabad
Follow us
आयपीएल 2020 च्या मोसमातली दुसरी क्वालिफायर मॅच आज (रविवार) अबुधाबी येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवली जाणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत फायनलला पोहोचायचंच याच इराद्याने हैदराबाद आणि दिल्ली हे दोन्ही संघ मैदानात उतरतील.
मागील मॅचमध्ये मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवून फायनलमध्ये प्रवेश केला, तर हैदराबादने बंगळुरुविरुद्ध तुफान सांघिक खेळाचं प्रदर्शन करत विराटच्या टीमला नमवलं.
आज विजयाच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरत असले तरी दिल्लीसमोर हैदराबादचं कडवं असणार आहे. कारण साखळी फेरीत झालेल्या दोन्ही मॅचमध्ये हैदराबादने दिल्लीला पराभूत केलं होतं.
हैदराबादची बॅटिंग आणि बॉलिंग आक्रमण सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तर साखळी फेरीत दमदार कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या टीमची सध्या सुमार कामगिरी होताना पाहायला मिळतीये. आजच्या मॅचमध्ये टॉस हा महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. कारण पाठीमागील 9 मॅचपैकी 8 मॅच दुसऱ्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकल्या आहेत.
आजची मॅच जिंकून फायनलमध्ये मुंबईशी कोण भिडणार याची उत्सुकता सगळ्याच क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.