Delhi Fire : 27 लोक जिवंत जळाले! आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख, दिल्लीच्या आगीची हादरवणारी कहाणी
काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे.
![शुक्रवारी दिल्लीत लागलेल्या भयंकर आगीमध्ये 27 लोक जिवंत जळाले. काही जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. सध्या आग आटोक्यात आली असली तर या आगीनं अनेकांची आयुष्य आणि संसार बेचिराख केले आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे. अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14121935/Delhi-Fire-01.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![दिल्लीतील मुंडका मेट्रो रेल्वे स्टेशन जवळ एक व्यावसायिक इमारत आहे. या इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालं. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यत आली. मात्र धुमसणाऱ्या आगीत 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आग भडकल्यानंतर काहींनी तर तर इमारतीवरुन जीव धोक्यात घालत उड्या टाकल्या होत्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14121932/Delhi-fire-02.jpg)
2 / 5
![शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही लाग भडकली. 100 पेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात यश आलंय. एनडीआरएफच्या पथकाकडून या ठिकाणी बचावकार्य करण्यात आलं. तब्बल 100 जणांचं पथक बचावकार्य करण्याच्या कामाला लागलंय. तर 27 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14121929/Delhi-fire-03.jpg)
3 / 5
![दरम्यान, ही आग भडकल्यानंतर कंपनीच्या मालकाला पोलिसांनी अटक केली होती. हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. सध्या त्यांची कसून चौकशी केली जाते आहे. या भीषण आगीनंतर इमारतीतील सामानाचा कोळसा झाला असून सगळीकडे राख पसरल्याचं चित्र दिसून आलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14121926/Delhi-fire-04.jpg)
4 / 5
![आगीच्या भीषण दुर्घटनेनंतर अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय. या घटनेनं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केलेत. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना मदतही जाहीर करण्यात आली आहे. मृतांच्या नातलगांचा दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14121923/Delhi-fire-05.jpg)
5 / 5
![सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Sara_Tendulkar-9.jpg?w=670&ar=16:9)
सारा तेंडुलकरचा सामना झाला जंगली सरड्याशी
![या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ? या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/11/cropped-carrot-juice.jpg?w=670&ar=16:9)
या लोकांनी चुकूनही गाजर खाऊ नये, पाहा का ?
![शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/symptoms-of-bad-shani.jpg?w=670&ar=16:9)
शनि दोष आहे की नाही, असं जाणून घ्या
![Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/feature-2024-12-16T185202.619.jpg?w=670&ar=16:9)
Kapoor Family : करिश्मा, करीना, रणबीरच्या कुटुंबातील एकमेव ग्रॅज्युएट माणूस, वयाच्या 67 व्या वर्षी डिग्री
![भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-king-corba.jpg?w=670&ar=16:9)
भारतातील सर्वात विषारी 3 साप, चावले तर हमखास मृत्यू होतो
![विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/vinod-kambali-2-1.jpg?w=670&ar=16:9)
विनोद कांबळीला मिळतात 3.6 लाख, पण या खेळाडूस मिळणार विक्रमी 31 कोटी रुपये