बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.
तिच्या नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. 'हॅरी पॉर्टर' लूकचा फोटो तिनं सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
'हॅरी पॉर्टर'चे एका पाठोपाठ एक असे सगळे चित्रपट पाहिल्यानंतर असा परिणाम झाला आहे,' असं कॅप्शनही तिनं तिच्या पोस्टला दिलं आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
ती नेहमीच कुटुंबियांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
माधुरी उत्तम डान्सर असून वयाच्या 53 व्या वर्षीसुद्धा डान्सचे उत्तम व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते.
सध्या माधुरीला कुकिंगचंही वेड लागलं आहे. ती सोशल मीडियावर कुकिंग रेसिपीज् शेअर करत असते.