Donald Trump Net Worth : श्रीमंतीत नाही कुठेच कमी, डोनाल्ड ट्रम्पची संपत्ती किती

Donald Trump Net Worth : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या अटकेचे नाट्य आज जगभर पसरलं. त्यांना अटक करण्यात आली आणि अवघ्या काही मिनिटांत सोडण्यात पण आले. ते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाकडून पुन्हा दावेदारी ठोकत आहेत. ते इतक्या संपत्तीचे धनी आहेत.

Donald Trump Net Worth : श्रीमंतीत नाही कुठेच कमी, डोनाल्ड ट्रम्पची संपत्ती किती
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:53 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) हे पुन्हा एकदा चर्चेत आले. गुरुवारी ट्रम्प यांना अटक करण्यात आली. पण अवघ्या 20 मिनिटांतच त्यांना सोडण्यात आले. ही अटक 2020 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली करण्यात आली होती. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी अडीच वर्षानंतर ट्विटरवर म्हणजे आताच्या एक्सवर पुनरागमन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अफाट पैसा, संपत्ती आहे. संपूर्ण जगभर त्यांचा उद्योग व्यवसाय पसरलेला आहे. अनेक क्षेत्रात त्यांच्या कंपन्या काम करतात. जगभर ट्रम्प यांच्या कंपन्यांची कार्यालये आहेत. तिथे मनुष्यबळ आहे. ट्रम्प हे इतक्या संपत्तीचे धनी आहेत. फोर्ब्सच्या 2023 मधील आकडेवारीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती 2.5 दशलक्ष डॉलर इतकी आहे. ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत सामील आहेत. दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली होती. त्यांची संपत्ती 3.3 दशलक्ष डॉलरवरुन घसरुन 2.5 दशलक्ष डॉलरपर्यंत खाली आली. 2020 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी अडीच वर्षानंतर ट्विटरवर म्हणजे आताच्या एक्सवर पुनरागमन केले आहे.  ते राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. त्यांनी ही निवडणुक पुन्हा प्रतिष्ठेची केली आहे. रिपब्लिकन पक्षात पसंती क्रमांकानुसार ते सध्या पहिल्या क्रमांकावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आलिशान बंगले आहेत. पण फ्लोरिडा येथील Mar-a-Lago बंगला हा एकदम प्रशस्त असा बंगला आहे. याठिकाणी ते पत्नीसोबत राहतात. मीडिया रिपोर्टसनुसार, ट्रम्प यांच्याकडे ट्रम्प वर्ल्ड टॉवर, ट्रम्प पार्क अव्हेन्यू, गोल्फ क्लब अशी अनेक मौल्यवान संपत्ती आहे.फायनेन्शिअल टाईम्समधील एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतींकडे रोल्स-रॉयस सिल्व्हर क्लाऊड, फँटम, मर्सिडीज-बेंज एसएलआर मॅकलेरन, लेम्बोर्गिनी डियाब्लो, टेस्ला रोडस्टर आणि कॅडिलॅक एलांटे अशा कारचे कलेक्शन आहे. याशिवाय त्यांच्याकडे 24 कॅरेट गोल्ड चॉपर पण आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.