युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे विमान रोमानियाहून दिल्लीत आले त्यावेळी तिथं पालकांना पाहून भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी परतलेल्यांचे दिल्ली विमानतळावरती स्वागत केले आहे,
तसेच अडकलेल्या सर्वांना आश्वासन दिले आहे, की युक्रेनमधील सर्व भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करू
आत्तापर्यंत भारतात 1500 हून अधिकजण युक्रेनमधून परत आले आहेत. 18000 हून अधिक नागरिक तिथं अडकल्याची भिती व्यक्त करण्यात आली होती.
ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमधून सुरू असलेल्या निर्वासन प्रयत्नांना गती देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाला निर्वासन प्रयत्नांमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुध्दा भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.
रशिया आणि युक्रेनच्या युध्दाला 5 दिवस पुर्ण झाले असून तिथली परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे
भारताच्या राजदूताने युक्रेन लवकरात लवकर सोडण्याचे आदेश दिले आहेत.
रशियाच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शने केली जात असून युद्ध थांबाव असं अनेकांना वाटतंय
अनेक इमारती कोसळल्या असून तिथं लोक प्रचंड भयभीत झाले आहेत.