Photo : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा प्रश्न पेटला, कोल्हापूर, सांगलीत आंदोलनानंतर इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय?
इचलकरंजी : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा दिवसा व्हावा तसेच रब्बी हंगामातील पिकांची अवस्था पाहता सलग 10 तास विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलनाला सुरवात केली होती. आता आंदोलनाची झळ ही सर्वत्र पोहचू लागली आहे. रात्रीच विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागात रास्तारोको करण्यात आला आहे. शिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरुच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories