नुकतंच पहिला मराठी प्लॅटफॉर्म ‘प्लॅनेट मराठी’च्या मुंबईतील ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं आहे.
जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या आणि आपली मराठी कलाकृती, संस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं काही महिन्यांपूर्वी 'प्लॅनेट मराठी' या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा करण्यात आली होती.
खरंतर प्रेक्षकांमध्ये तेव्हापासून 'प्लॅनेट मराठी' विषयी उत्सुकता होती. अखेर या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे.
आता 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ सोहळा दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे आता लवकरच 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या भेटीस दाखल होणार आहे.
या सोहळ्याला सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेते सचिन पिळगावकर, मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, श्रुती मराठे, सायली संजीव, गायत्री दातार, गौरव घाटणेकर, नेहा पेंडस अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
एवढंच काय तर सायली संजीवचा वाढदिवसही या वेळी साजरा करण्यात आला.
स्वप्निल जोशीनंही यावेळी खास हजेरी लावली.
अभिनेत्री अमृता खानविलकर यावेळी प्रचंड सुंदर दिसली.