बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 73 वा वाढदिवस आहे.
जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये झाला.
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं.
जया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.
1963 मध्ये सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘महानगर’मध्ये जया यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती.
जया बच्चन यांना आतापर्यंत 9 फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले आहेत. त्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्री, सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
तर 2007 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत.
आतापर्यंत 3 आयआयएफए पुरस्काराने जया बच्चन यांना सन्मानित करण्यात आले.
जया यांनी 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले.
जया बच्चन यांनी आतापर्यंत 35 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.