बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आज त्याला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 20 नोव्हेंबर 1976 ला मुंबईमध्ये झाला.
तुषारनं ‘मुझे कुछ कहना है’या चित्रपटातून करीना कपूरसोबत चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारसुद्धा मिळाला होता.
त्यानंतर त्यानं ‘जीना सिर्फ मेरे लिए’, ‘कुछ तो है’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र हे चित्रपट फ्लॉप ठरले.
तुषार कपूरनं हार न मानता ‘गायब’या चित्रपटात पुन्हा अभिनय केला. या चित्रपटासाठी तुषारचं कौतुकही झालं.
त्यानंतर रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’या चित्रपटात तुषार झळकला आणि या चित्रपटात त्यानं अफलातून अभिनय केला.
मात्र अजूनही तो सोलो हीट चित्रपट देण्यासाठी स्ट्रगल करत आहे.
तुषार सध्या त्याच्या मुलासोबत वेळ घालवत आहे.
अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी' या चित्रपटाचा तो निर्माता आहे. अभिनयात आपलं नशीब आजमावून झाल्यानंतर आता तो प्रोड्यूसर होण्याच्या मार्गावर आहे.