आज सकाळापासून ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे, काल रात्रीपासून मुंबईसह अनेक ठिकाणी तुरळत पावसाच्या सरी झाल्या आहेत. त्यामुळं वाहतूक संथगतीने सुरु आहे.
ठाण्यातील टोलनाका ते कॅडबरी जंक्शन पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्यात अनेक अवजड गाड्या असल्यामुळे ठाणेकरांना मोठा फटका सहन करावा लागत आहे.
सकाळी कामावर निघालेल्या लोकांना या वाहतूक कोंडीचा चांगलाचं फटका बसला आहे. काही लोकांनी कंठाळून पायी प्रवास केला आहे.
ठाण्यातील सर्व्हिस रोडवर देखील अवजड वाहने आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली, सकाळी तिथं काही पोलिस दाखल झाल्यामुळे काही वेळात वाहतुक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
मुंबई अहमदाबाद हायवे मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे गाडीत असलेले नागरिक संतप्त झाले आहेत. पोलिस तिथून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.