Hero Optima ते Bajaj Chetak, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात उपलब्ध, किंमत 28 हजार रुपयांपासून सुरु
पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. अशा परिस्थिती नागरिक वाहन खरेदी करताना मायलेजचा अधिक विचार करु लागले आहेत. तर काहींचा इलेक्ट्रिक स्कूटरकडे कल वाढू लागला आहे.
Follow us
पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. अशा परिस्थिती नागरिक वाहन खरेदी करताना मायलेजचा अधिक विचार करु लागले आहेत. तर काहींचा इलेक्ट्रिक स्कूटरकडे कल वाढू लागला आहे. परंतु इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या किंमती अधिक असल्याची ओरड नेहमी ऐकायला मिळते. त्यामुळे आम्ही तुम्हाला किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर्सबाबतची माहिती देणार आहोत.
Ampere V 48 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर : Ampere V 48 ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरची किंमत 28,900 रुपयांपासून सुरु होते. या स्कूटरमध्ये लिड अॅसिड बॅटरी देण्यात आली आहे. Ampere V 48 ही स्कूटर 25 किलोमीटरच्या स्पीडने धावते. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 50 किलोमीटरपर्यंत धावू शकते. 8 ते 10 तासात या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होते.
Okinawa Ridge : ओकिनावा हा इलेक्ट्रिक स्कूटर्सचा सर्वात लोकप्रिय बँड आहे. या कंपनीच्या Ridge या इलेक्ट्रिक स्कूटरला खूप लोकप्रियता मिळाली आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 44,990 रुपये आहे. 6 तासात ही स्कूटर पूर्ण चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 80 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते.
Hero Optima : हिरो ऑप्टिमाची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात 41,770 रुपयांपासून (दिल्ली आणि मुंबई) सुरु होते. 8 ते 10 तासांत या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होते, एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 25 किलोमीटपर्यंतचा प्रवास करु शकते.
Bajaj Chetak Electric Scooter (बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर) : या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1 लाख रुपये इतकी आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 95 किलोमीटपर्यंतचा प्रवास करु शकते.