IMD Monsoon Forecast : राज्यात आज पुन्हा पाऊस, आयएमडीकडून या जिल्ह्यांना हायअलर्ट
महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पाऊस सुरूच असून याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला.दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Follow us
महाराष्ट्राला परतीच्या पावसानं झोडपून काढलं आहे, राज्यात पाऊस सुरूच असून याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला.दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. तर बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं असणार आहे.
कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील आज पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान एक दिलासादायक बातमी म्हणजे आता परतीच्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस राज्यात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे.
परतीच्या पावसाचा मोठा फटका हा, शेतकऱ्यांना बसला आहे, मात्र आता पाऊस उघडीप देणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.