वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये (India vs West indies T 20 Series) टीम इंडियाने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. वनडे सीरीजमध्ये आधी क्लीनस्वीप केलं. त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit sharma) टीमने टी-20 मालिकाही सहज जिंकली. महत्त्वाचं म्हणजे या मालिका विजयानंतर टीम इंडिया तब्बल सहावर्षांनी टी 20 फॉर्मेटमध्ये नंबर एक टीम बनली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज सर्वात धोकादायक संघ समजला जातो. त्या संघाला नमवून भारताने मिळवलेला हा विजय खास आहे. भारताने या मालिकेत अनेक बदल केले. नवीन खेळाडूंना संधी दिली. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. तरी भारतीय संघाने वनडे आणि टी-20 दोन्ही मालिकांवर वर्चस्व गाजवलं. टी-20 मधील भारताच्या विजयात सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ऋषभ पंत, विराट कोहली (Virat kohli) आणि वेंकटेश अय्यर यांनी आपलं योगदान दिलं.