Indian Air Force Day 2020 | भारताच्या ‘हवाई’ शक्तीचं प्रदर्शन, राफेलसह लढाऊ विमानांचा आकाशात थरार!
आज भारतीय वायू दलाचा 88 वा स्थापना दिन आहे. त्यानिमित्ताने वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. (Indian Air Force Day 2020)
Follow us
भारतीय हवाई दलाच्या 88व्या स्थापना दिनानिमित्ताने आज गाझियाबादच्या आकाशात हवाई दलाचा थरार पाह्यला मिळाला. गाझियाबादच्या हिंडन तळावर हवाई दलाच्या विमानांच्या काळजात धडकी भरवणाऱ्या चित्त थरारक कवायती रंगल्या. या कवयातीं पाहून देशवासियांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे.
दरवर्षी या सोहळ्याला 15 हजाराहून अधिक लोक उपस्थित असतात. मात्र यंदा काही ठराविक मान्यवरांची या सोहळ्याला उपस्थित आहे.
हवाई दल स्थापना दिनानिमित्त चिनूक आणि अपाचे या हेलिकॉप्टरद्वारे तीन सेना प्रमुखांनी सलामी दिली.
या निमित्ताने राफेल, तेजस, जॅग्वार, सुखोई या लढाऊ विमानांचा आकाशात थरार पाहायला मिळाला.
राफेलनंतर लगेचच स्वदेशी तेजस विमानाने अवकाशात भरारी घेतली.
तसेच लढाऊ विमानांव्यतिरिक्त सूर्यकिरण टीमने पुन्हा एकदा आकाशात पराक्रम दाखवले.
कॉमन प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या स्टेप्सने करा डाउनलोड