शेतकऱ्यांसाठी काय पण..! आज फॉर्च्यूनर उद्या बीएमडब्ल्यू मधूनही द्राक्ष विक्री झाली पाहिजे, कोल्हापूरच्या बहाद्दराने वेधले लक्ष
कोल्हापूर : शेतकरी केवळ नावाला राजा आहे. मात्र, आजही उत्पादन आणि शेतीमाला मिळणारे दर यामुळे जीवनमानात काही फरक पडलेला नाही. आजही सर्वकाही बाजारपेठेवरही आणि मध्यस्ती असलेल्या दलालावरच अवलंबून आहे. ग्राहक आणि शेतकरी यांच्यात मोठी दरी निर्माण झाली असून त्याचा फायदा हे मध्यस्ती घेत आहेत. मात्र, दरी मोडीत काढण्यासाठी कोल्हापूरात एका शेतकऱ्यांने राबवलेला अनोखा फंडा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पट्ट्याने चक्क फॉर्च्यूनर गाडीमध्येच द्राक्षांचा स्टॉल उभारला आहे. तावडे परिसरात अलिशान फॉर्च्यूनर गाडी...शेतकरी राहुल सावंत यांच्या गळ्यात सोन्याचा कंठा आणि बाहूवर 7/12 चा उल्लेख आणि द्राक्ष विक्रीचा उभारलेला स्टॉल हा सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. शिवाय शेतकऱ्यानेच असेच असायला पाहिजे. शेतकरी एवढा समृध्द पाहिजे की फॉर्च्यूनरच काय तर त्याने बीएमडब्ल्यू मधून आपल्या शेतीमालाची विक्री करायला पाहिजे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Most Read Stories