आयपीएलच्या 13 व्या मोसमाला शनिवारी 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. IPL 2020 : Mumbai Indians Excite Playing Against Chennai Super Kings
Follow us
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. 19 सप्टेंबरला हा सामना अबुधाबीत खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी सज्ज आहोत, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने दिली आहे.
कोरोनापरिस्थितीमुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं आयोजन यूएईमध्ये केलं आहे. यूएईमध्ये 2014 मध्ये आयपीएलचे काही सामने खेळवण्यात आले होते. मुंबईने 2014 मध्ये प्लेऑफमध्ये धडक मारली होती.
सालाबादप्रमाणे यंदाही सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात करणार असल्याचं रोहित म्हणाला.
चेन्नईविरुद्धच्या सर्व आव्हानांसाठी आम्ही सज्ज आहोत. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई यशस्वी संघ राहिला आहे. चेन्नईने 3 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे चेन्नईला गृहीत धरता येणार नाही. विजयी सुरुवात करण्याचा मानस प्रत्येक संघाचा असेल, असंही रोहित म्हणाला.
चेन्नईमध्ये अनेक आक्रमक खेळाडू आहेत. त्यामुळे चेन्नईविरुद्धचा सामना चुरशीचा होईल, अशी आशा रोहितने व्यक्त केली आहे.
यूएईमध्ये 2014 मध्ये आयपीएलचे काही सामने खेळवण्यात आले होते. मुंबईने 2014 मध्ये प्लेऑफमध्ये धडक मारली होती.
यूएईमधील खेळपट्ट्या फक्त फिरकीपटूंसाठीच नाहीतर वेगवान गोलंदाजांसाठीही फायदेशीर ठरतील. या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना रिव्हर्स स्वींगसाठी अनुकूल ठरतील, असा विश्वास रोहितने व्यक्त केला.
तसेच जेम्स पॅटिन्सन , धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान यासारखे गोलंदाज आहेत. ज्यांना मलिंगाच्या जागेवर संधी देऊ शकतो. वैयक्तिक कारणामुळे मलिंगाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. छायाचित्र सौजन्य : मुंबई इंडियन्स ट्विटर हॅंडल