मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) किंग्स इलेवन पंजाब संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मयंक अग्रवालला पंजाब किंग्सने 12 कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं.
पंजाबच्या संघाने आतापर्यंत आयपीएलचा किताब जिंकलेला नाही. त्यामुळे मयंकच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असेल.
कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये 16 फेब्रुवारी 1991 रोजी मयंकचा जन्म झाला. मयंकचे वडिल एका हेल्थकेयर कंपनीत सीईओ आहेत. त्याची आई सुचित्रा सिंह गृहिणी आहे.
मयंक अग्रवाल जवळपास 26 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. बीसीसीआयचे वेतन, आयपीएल करार आणि खासगी व्यवसायातून त्याने इतकी संपत्ती कमावली आहे.
मयंक बंगळुरुतील एका लग्जरी डिझायनर घराचा मालक आहे. त्याची देशभरात अनेक ठिकाणी घरं आहेत. मयंककडे जगातील काही निवडक आलिशान कार आहेत. मयंककडे मर्सिडीज एसयूव्ही कारही आहे.
मयंकने त्याची लहानपणीची मैत्रीण आशिता सूद सोबत जून 2018 मध्ये लग्न केलं. पत्नी पेशाने वकील आहे.
शाळेपासूनच दोघे परस्परांचे चांगले मित्र होते. हळूहळू मैत्रीच नात प्रेमात बदललं. आशिताचे वडिल प्रवीण सूद पोलीस कमिशनर होते. सध्या ते कर्नाटकचे डीजीपी आहेत.
शाहरुख खान आणि अक्षय कुमार हे मयंकचे आवडते अभिनेते आहेत. आलिया भट आणि कॅटरिना कैफ या त्याच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. डाळभात तसेच पिझ्झा हे त्याचे आवडते पदार्थ आहेत.
मयंक अग्रवालने आतापर्यंत 16 कसोटी सामन्यात 43.30 च्या सरासरीने 1429 धावा केल्या आहेत. यात चार शतक आणि सहा अर्धशतक आहेत.
243 ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. कसोटीमध्ये आतापर्यंत त्याने 28 षटकार आणि 178 चौकार लगावले आहेत.