PHOTO | जाणून घ्या नितीश कुमार यांचा इंजिनियरिंग ते राजकारणापर्यंतचा प्रवास
नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 मध्ये बख्तियारपूर येथे झाला. ते इंजिनियर आहेत. त्यांनी आपली पदवी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या कॉलेजमधून प्राप्त केली. ही संस्था आता एनआयटी या नावाने ओळखळी जाते.
Follow us
संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चार दशकांपेक्षा जास्त काळ बिहारच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे नितीश कुमार यावेळीदेखील निवडणुकीच्या केंद्रस्थानीच राहीले. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 मध्ये बख्तियारपूर येथे झाला. ते इंजिनियर आहेत. त्यांनी आपली पदवी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या कॉलेजमधून प्राप्त केली. ही संस्था आता एनआयटी या नावाने ओळखळी जाते.
नितीश कुमार यांनी आपला राजकीय प्रवास 1977 मध्ये सुरु केला. नितीश आपल्या विद्यार्थी जीवनातच राजकारणाच्या आखाड्यात उतरले होते. इंजिनियरींगचे शिक्षण घेत असतानाच ते जयप्रकाश नारायण यांच्या संपर्कात आले.
नितीश कुमार यांना जयप्रकाश नारायण यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. वक्तृत्व शैलीत तरबेज असल्यामुळे नितीश कमी वेळात जनतेच्या मनात घर करत.
सन 1987 मध्ये नितीश कुमार यांना युवा लोकदल चे अध्यक्ष बनवले गेले. त्यानंतर त्यांची 1989 मध्ये जनता दल पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती झाली.