बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा 2012 मध्ये अग्नीपथ हा चित्रपट रिलीज झाला. संजय दत्त आणि प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. अग्नीपथमध्ये कनिका तिवारी ही हृतिक रोशनच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली.
अग्नीपथमध्ये कनिका तिवारीचे नाव शिक्षा होते. या चित्रपटात कनिका तिवारी ही खूप जास्त घाबरलेल्या मुलीच्या भूमिकेत होती. चित्रपटात घाबरलेली कनिका तिवारी ही आता खूप मोठी झाली असून बोल्डही झालीये.
कनिका तिवारी हिच्यामध्ये इतके जास्त बदल झाले आहेत की, तिला सुरूवातीला ओळखणे देखील शक्य नाहीये. कनिका तिवारी हिचा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.
फक्त अग्नीपथच नाहीतर यासोबतच तिने काही साऊथच्या चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे कनिका तिवारी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.
चाहत्यांसाठी खास आणि बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. कनिका तिवारी हिला सोशल मीडियावर तब्बल 58.9k लोक फॉलो करतात. चाहते तिच्या बॉलिवूडच पुनरागमनाची वाट पाहत आहेत.