पार्टीच्या नादात विसरून जावू नकी तुम्ही किती प्रमाणात बिअर घेत आहात. नेहमीपेक्षा जास्त घेण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करू नका. नाहीतर तुम्हाला ते अंगलट येवू शकतं.
बिअर पिण्यापूर्वी काहीतरी खा, रिकाम्या पोटी कधीही दारू पिऊ नका. तुम्ही काहीही खाल्ले नाही तर अल्कोहोलने तुमच्या पोटात आग पडेल आणि बिअर जास्त चढेल.
बिअर पित असताना उगाच टॉप टू बॉटम असे खेळ करणं टाळा. बिअरसोबत मसालेदार पदार्थ खावू नका त्यामुळे तुमच्या पचनप्रकियेवर परिणाम होऊ शकतो.
तुम्ही बिअरसोबत चॉकलेट किंवा ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. अल्कोहोलमुळे डिहायड्रेशन होते म्हणून अधूनमधून पाणी पित जा. दारू पिऊन गाडी चालवू नका. हा वाहतुकीचा नियम मोडला आहे.
पार्टीला बसले की बिअर किंवा दारू प्यायलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही. मित्रांच्या दबावाखाली काही केले पाहिजे.