पंजाबी ड्रेसमध्ये दिसायचं असेल स्टायलिश तर कधीच करू नका या चुका
सण समारंभानिमित्त आजकाल बऱ्याच महिला साडीपेक्षाही चांगला, हेवी वर्क असलेला ड्रेस घालणं पसंत करतात. ड्रेस कितीही उत्तम असो, पण तुमच्या या चुकांमुळ ड्रेसचा आणि तुमचाहीटचा पूर्ण लूक बिघडू शकतो.
Follow us
सलवार सूट हा असा पोशाख आहे जो बहुतेक सणांसाठी, पार्टी, समारंभासाठी परिधान केला जातो. आजकाल बाजारात अनेक प्रकारचे पंजाबी सूट उपलब्ध आहेत. पण सूट परिधान करताना स्टायलिश दिसण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
आजकाल मुली वेगळी कुर्ती आणि पलाझो किंवा सलवार वेगळी, अस कॉम्बिनेशन घालतात. मात्र अशा परिस्थितीत रंगसंगतीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. सूट, सलवार आणि दुपट्टा यांचे कलर कॉम्बिनेशन एकमेकांशी जुळले पाहिजे.
तुम्ही कितीही छान कपडे परिधान केलेत तरी, पण तुम्ही फुटवेअरचा चांगला पर्याय निवडला नाही तर तो तुमचा लुक खराब करू शकतो. हील्स आणि पंजाबी शूज हे सूटसोबत चांगले दिसतात.
स्टायलिश दिसण्यासाठी सर्वोत्तम पोशाख निवडणे महत्त्वाचे आहे. त्यासोबतच दुपट्टा ड्रेपिंग स्टाइलही उत्तम असावी. सूटनुसार तुम्ही ओपन फॉल स्टाइल, डबल शोल्डर स्टाइल आणि बॅक साइड दुपट्टा कॅरी करू शकता.
गरजेपेक्षा जास्त दागिने घालू नयेत हे लक्षात ठेवा. जर तुम्ही हेवी वर्क असलेला ड्रेस घातला असेल तर खूप हेवी दागिने घालू नका. तुम्ही साधे कानातले पण कॅरी करू शकता. हलक्या सूटवर तुम्ही हेवी ज्वेलरी घालू शकता.