आजच्या युगात रेफ्रिजरेटर किंवा फ्रीज हा जवळपास प्रत्येक घरात आढळतो. काही लोक फ्रिज हॉलमध्ये ठेवतात तर काहीजण किचनमध्ये ठेवतात. किचन किंवा हॉलमध्ये किती जागा उपलब्ध आहे यावरही फ्रीज ठेवण्याची जागा अवलंबून असते. पण बरेचजण फ्रीज भिंतीला लावून ठेवतात. मात्र, फ्रीज आणि भिंतीमध्ये किती अंतर असावे हे अनेकांना माहीत नसते.
तज्ज्ञांच्या मते, फ्रीज भिंतीपासून 6-10 इंच लांब अंतरावर ठेवावा. खरंतर, कोणत्याही फ्रीजला आतून थंड ठेवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. थंड होण्याच्या या प्रक्रियेदरम्यान, ग्रीलद्वारे उष्णता आतून सोडली जाते. यामुळेच फ्रीज थेट भिंतीला चिकटवून ठेवू नये.
समजा तुम्ही तुमचा फ्रीज पूर्णपणे भिंतीला चिकटवून ठेवला तर गरम हवा नीट बाहेर पडू शकणार नाही. अशा वेळी फ्रीजला आतून थंड करण्यासाठी अधिक प्रक्रिया करावी लागेल. यामुळे तुमच्या खिशावर भार पडू शकतो, कारण त्यामुळे फ्रीजसाठी जास्त वीज वापरली जाईल, पर्यायाने बिल अधिक येईल.
तुम्हाला फ्रीज भिंतीपासून 6-10 इंच अंतरावर ठेवावा लागेल. तसेच तुमचा फ्रीज थेट हीटर किंवा इतर गरम स्त्रोतांजवळ ठेवू नये, हेही आवर्जून लक्षात ठेवा.
त्यामागचे कारणही जाणून घ्या. खरंतर तुम्ही असं केलं तर तापमानात खूप फरक पडेल. असे केल्यावर तुमचा फ्रीज आतून ओला होऊन बर्फ बनवायला सुरुवात करेल. असे झाले तर ते तुमच्या फ्रीजसाठी अजिबात योग्य नाही.